अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह २०२२ विशेष सुरक्षा विभाग निवड प्रक्रिया -2022 करीता राज्य राखीव पोलीस बल गट क्र.3 चे अंमलदारकरिता शारीरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक. विशेष सुरक्षा विभाग निवड प्रक्रिया -2022 करीता राज्य राखीव पोलीस बलातील उर्वरित 377 अंमलदारांच्या शारीरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक. पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षाबाबत सूचना. पोलीस शिपाई भरती - २०२१, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन दक्षता मासिक देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ज्येष्ठ नागरिकांसाठी

१. ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींचाच सहभाग असतो. उदाहरणार्थ, नोकर, नातेवाईक, विक्रेते आदी. 

२. हे लोक सहसा पोलीस रेकॉर्डवर नसतात. 

३. घरगुती मदतनीस/नोकरमाणसे काम सोडून जातील या भीतीतून त्यांची माहिती सहसा पोलिसांना कळवली जात नाही. 

हे करा आणि हे करू नका

- नजीकच्या पोलीस ठाण्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा पूर्वेतिहास पडताळल्यानंतरच तिला कामावर ठेवावे. 

- कायम ओळखपत्र जवळ बाळगा

- नोकरमंडळी/अपरिचित लोकांसमोर आर्थिक बाबींवर चर्चा करू नका.

- तुमचे मौल्यवान सामान कोणत्याही बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवा.

- नोकरमंडळींशी माणुसकीने वागा

- तुमच्या नोकरांच्या नातेवाईक व मित्रमंडळींना सामान्यपणे तुमच्या घरी येऊ देऊ नका. तुमच्या मदतनिसाला भेटायला वारंवार कोणी येत असेल तर त्याचा/तिचा पूर्वेतिहास तपासून घ्या. अशा व्यक्तींची संख्या कमीतकमी राखा. 

- तुम्ही एकटे राहत असाल, तर तुमच्या शेजाऱ्यांना आणि हाउसिंग सोसायटीच्या सेक्रेटरींना तशी माहिती देऊन ठेवा.

- डोअर अलार्म, इलेक्ट्रॉनिक आय-बेल यांसारख्या आधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर नेहमीच उपयुक्त ठरतो. अशी उपकरणे बसवून घेण्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

- तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पीपहोल करून घ्या आणि नेहमी परिचित व ओळख पटलेल्या व्यक्तींनाच घरात प्रवेश द्या. डबल डोअर प्रणाली बसवून घ्या. अपरिचितांशी बोलताना कायम मुख्य दार बंदच ठेवा किंवा शेजाऱ्यांना व सुरक्षा कर्मचाऱ्याला सांगूनच अपरिचितांशी बोला.

- घराच्या मूळ किल्ल्या किंवा जास्तीच्या किल्ल्या कधीही उघड्यावर किंवा सहज सापडतील अशा जागी ठेवू नका.

- दुरुस्त्यांसाठी आलेले लोक, विक्रेते यांची ओळख पटल्यानंतरच त्यांना घरात प्रवेश द्या तसेच त्यांना प्रवेश देण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती देऊन ठेवा.

- तुम्ही एखाद्या कामगाराला किंवा विक्रेत्याला घरात प्रवेश दिलात, तर त्याला घरात एकटा कधीच सोडू नका. 

- ठळक, व्यवस्थित उजेड असलेल्या तसेच वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही अधिक सुरक्षित असता.

- चालायला किंवा धावायला गेल्यानंतर आसपासच्या वातावरणाबाबत सजग राहा. अशा वेळी इअर फोन्स वगैरे वापरणे टाळा.

- आपत्कालीन औषधे तसेच फॅमिली डॉक्टरांचा संपर्क क्रमांक तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे क्रमांक हाताशी (सहज सापडतील असे) ठेवा.