अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस स्‍मृतिदिन परेड, राष्ट्रीय पोलीस स्मारक, नवी दिल्लीचे थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

पोलीस स्‍मृतिदिन परेड, राष्ट्रीय पोलीस स्मारक, नवी दिल्लीचे थेट प्रक्षेपण

एमपीडीमध्ये सहभागी व्हा!

महाराष्ट्र पोलीस दलातील (एमपीडी) नोकरीच्या संधी

महाराष्ट्र पोलिस दलात १६००० अधिकारी आणि १,५०,००० कर्मचारी आहेत. नागरिकांच्या सुरक्षा व संरक्षणासाठी वचनबद्ध असा हा व्यावसायिक पोलिसिंग विभाग आहे. 

तुम्ही खालील प्रकारे एमपीडीमध्ये सहभागी होऊ शकता: 

  • सहाय्यक उपअधीक्षक (एएसपी/आयपीएस) 
  • पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी/एसपीएस) 
  • पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) 
  • कॉन्स्टॅब्युलरीचे सदस्य (हवालदार) (पीसी/पीएन/एचसी किंवा एएसआय म्हणून)

१. सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होण्यासाठी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (यूपीएससी)  घेतली जाणारी वार्षिक परीक्षा देऊन देशभरातील प्रतिभावंतांशी स्पर्धा करावी लागते. अधिक तपशिलांसाठी लॉग ऑन करा: http://upsc.gov.in

२. पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू होण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार अर्ज करावा लागतो. पोलीस उपअधीक्षक हा राजपत्रित अधिकारी असतो आणि त्याला पोलीस सेवेत उत्तम कारकिर्दीची संधी असते. अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा: http://mpsc.gov.in

३. पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या उत्तरादाखल अर्ज करावा लागतो. 

  • किमान अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • वय: २८ वर्षांपर्यंत (आरक्षित प्रवर्गांसाठी ३३ वर्षांपर्यंत)
  • परीक्षेची पद्धत: प्राथमिक व मुख्य परीक्षा घेतल्या जातात. यात उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. 
  • प्रशिक्षण: यशस्वी उमेदवारांना नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ११ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. 
  • वेतनश्रेणी: ५५००-१७५-७०००

अधिक तपशिलांसाठी लॉग ऑन करा: http://mpsc.gov.in

४. कॉन्स्टॅब्युलरीचे सदस्य म्हणून रुजू होण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती पोर्टलवर महाराष्ट्र पोलीस खात्याने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या उत्तरादाखल अर्ज करावा लागतो. 

  • किमान अर्हता: १२वी उत्तीण (एचएससी)
  • वय: २८ वर्षांपर्यंत, आरक्षित प्रवर्गांसाठी ३३ वर्षांपर्यंत
  • उंची: पुरुषांसाठी १६५ सेमी आणि स्त्रियांसाठी १६१ सेमी
  • छाती: पुरुषांसाठी ७९-८४ सेमी
  • परीक्षेचा नमुना: यात अनेक शारीरिक चाचण्या व एक लेखी परीक्षा अशी सांगड घातली जाते. 
  • प्रशिक्षण: यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण स्कूल्समध्ये ९ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. 
  • वेतनश्रेणी: ५२००-२०२००
  • ग्रेड पे: २०००

 या सूचना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत. अधिक तपशिलांसाठी संबंधित खात्यांच्या वेबसाइट्स बघाव्या.